शिवाजी वाहनधारक पतसंस्थेत वीज बिल भरणा केंद्र सुरू....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:01+5:302021-01-03T04:26:01+5:30
यावेळी मुश्रीफ म्हणाले, श्रीनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून संलग्न संस्थांमध्ये सभासद व ग्राहकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वीज ...

शिवाजी वाहनधारक पतसंस्थेत वीज बिल भरणा केंद्र सुरू....
यावेळी मुश्रीफ म्हणाले, श्रीनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून संलग्न संस्थांमध्ये सभासद व ग्राहकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू केल्यामुळे समस्त कागलवासीयांना याचा लाभ होणार आहे. वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराने श्रीनाथ समूहाची वाटचाल सुरू आहे. यावेळी चद्रंकात गवळी, एस. डी. पाटील, शामराव पाटील यांची भाषणे झाली. स्वागत महेश गवळी यांनी केले. आभार गंगाराम शेवडे यांनी मानले. यावेळी आनंदराव वास्कर, जयसिंगराव कोकाटे, बाबासाहेब नाईक, शिवाजीराव गवळी, सुमन गवळी, जयश्री शेवडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ०२ कागल शिवाजी संस्था
ओळी -
श्री शिवाजी वाहनधारक पतसंस्थेच्या वीज बिल भरणा केंद्राचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला.