नियोजनबद्ध कामामुळेच शिवाजी विद्यापीठाचे नाव देशाबाहेर : शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:19+5:302021-01-25T04:24:19+5:30
कोल्हापूर : प्रशासकीय कामकाज नियोजनबद्ध केल्यामुळेच शिवाजी विद्यापीठाचे नाव देशातच नव्हे तर देशाबाहेर पोहचल्याचे गौरवोद्दगार कुलगुरू डाॅ. डी. टी. ...

नियोजनबद्ध कामामुळेच शिवाजी विद्यापीठाचे नाव देशाबाहेर : शिर्के
कोल्हापूर : प्रशासकीय कामकाज नियोजनबद्ध केल्यामुळेच शिवाजी विद्यापीठाचे नाव देशातच नव्हे तर देशाबाहेर पोहचल्याचे गौरवोद्दगार कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठ सेवकसंघाचे संस्थापक अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला कुलगुरू डॉ. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांच्या हस्ते व्ही. आर. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठातील संशोधक हे जरी संशोधनाचे काम करीत असले तरी खऱ्या अर्थाने आपण सर्व सेवक हे विद्यापीठाचे आधारस्तंभ आहेत. सर्वानीच चांगल्या प्रकारे कामकाज केल्यामुळे आज शिवाजी विद्यापीठ शिखरावर पोहचलेले आहे.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू खाडे, संभाजी जगदाळे, रमेश पवार, वर्षा सतीश पाटील, प्रभाकर चिंचणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
संभाजी कांबळे, राम तुपे, विशांत भोसले, शशिकांत साळुखे, सुरेश पाटील, शेखर खामकर, दीपक काशीद, राजेश चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अजय आयरेकर, जनार्दन सुर्कुले, सुनील जाधव, संदीप हेगडे, डॉ. राजेद्र खामकर, प्रमोद चव्हाण, शिरीष देसाई, शफिक देसाई, सुनीता यादव, सुरेखा आडके, देवयानी यादव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवाजी विद्यापीठ सेवकसंघाचे संस्थापक अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबा सावंत, डॉ. पी. एस. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२३०१२०२१-कोल-शिवाजी)