शिवाजी विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर ठरले ‘उदयोन्मुख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:26+5:302021-05-12T04:25:26+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस’ला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ केंद्राचा दर्जा ...

Shivaji University's incubation center becomes 'emerging' | शिवाजी विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर ठरले ‘उदयोन्मुख’

शिवाजी विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर ठरले ‘उदयोन्मुख’

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस’ला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ केंद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याअंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती या सेंटरचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी मंगळवारी दिली.

या नवोपक्रम संस्थेकडून राज्यातील विद्यापीठातील नवोपक्रम केंद्रांच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. संस्थेच्या आढावा बैठकीमध्ये विविध विद्यापीठांचे बिगिनर्स (प्राथमिक), इमर्जिंग (उदयोन्मुख) आणि लीडर (नेतृत्वकर्ता) अशी विभागणी केली आहे. त्यामध्ये उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत शिवाजी विद्यापीठास दोन टप्प्यात मिळून एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. याअंतर्गत नवीन स्टार्टअप उपक्रमांची सुरुवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, हॅकेथॉन उपक्रमांचे आयोजन, नवीन सहकार्य संधींचे विकसन, नवीन मेंटॉर्सना प्रशिक्षण, रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन आणि स्टार्टअप्सना बाह्य संस्थांकडून निधी प्राप्तीस प्रोत्साहन, आदी उपक्रम केंद्राकडून राबविण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

प्रतिक्रिया

शिवाजी विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस स्थापन करण्यामागे विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, काही वेगळ्या संकल्पनांवर काम करू इच्छिणाऱ्या युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. राज्य नवोपक्रम संस्थेकडून प्राप्त झालेला दर्जा आणि निधी यामुळे अशा नवसंकल्पनांना ‘लॅब टू लँड अँड टू मार्केट’ असे मूर्त स्वरूप देणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात नवोपक्रम विकास व प्रोत्साहनाचे नियोजन केंद्रामार्फत करण्यात येईल.

-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

Web Title: Shivaji University's incubation center becomes 'emerging'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.