शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नॅनो संमिश्रातून बनविलेला रंग रोखणार सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:30 IST

सूक्ष्मजीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजार होतात.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. डी. डेळेकर आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी प्रा. शामकुमार देशमुख यांनी ‘अँटिमायक्रोबियल रंगाकरिता नॅनो संमिश्र’ याबाबत संशोधन केले. त्यांना या संशोधनाकरिता भारतीय पेटंट मिळाले आहे. या रंगाच्या वापरातून सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार रोखता येणार आहे.मानवाच्या दैनंदिन जीवनात विषाणू, बुरशी, आदी सूक्ष्मजीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात ते त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. हे सूक्ष्मजीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजार होतात. त्याचसोबत या सूक्ष्मजीवजंतूच्या प्रसारामुळे अनेकवेळा रुग्ण दवाखान्यामध्ये एका आजारासाठी प्रवेश घेतो.परंतु काही वेळा तो सूक्ष्मजीवजंतूच्या संसर्गजन्य आजारामुळे दगावतो. किंबहूना मधुमेही, बीपी रुग्णांना अशा सूक्ष्मजीवजंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत असते. कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजाराची प्रचिती सारे जग अनुभवत आहे. त्यामुळेच या सूक्ष्मजीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्यासाठी प्रा. डेळेकर आणि देशमुख यांनी अँटिमायक्रोबियल रंगाकरिता आवश्यक नॅनो संमिश्र यांच्या संशोधनातून तयार केली आहेत. अशा रंगाचे आवरण घरातील व दवाखानातील विविध वस्तूना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीवजंतू नष्ट होऊन त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजाराचा अटकाव होवू शकतो. हा रंग हा घरातील, कार्यालयातील, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्ची, आदींसाठी वापरू शकतो. वाहनांच्या पत्र्यांना या रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतुविरहीत होवू शकतात.

आम्ही संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटिमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. या संशोधनाचे श्रेय शिवाजी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे आहे. या संशोधनाला गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पेटंट दिले आहे. -प्रा. एस. डी. डेळेकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठResearchसंशोधन