शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून गैरव्यवहारांचे प्रमाद-शिक्षक संघाचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:48 IST

निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी

ठळक मुद्देबेकायदेशीर कारभाराच्या चौकशीची मागणी; प्राध्यापक सह्यांची मोहीम राबविणार

कोल्हापूर : निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केले आहेत. कुलगुरूंच्या प्रमादांची, गैर व भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ‘सुटा’ने गुरुवारी आंदोलन सुरू केले.

‘सुटा’च्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या दोन वर्षांतील गैर, भ्रष्ट व बेकायदेशीर, नियमबाह्य कारभाराची सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या कारभाराची सुमारे ८० प्रकरणे असून, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या गैरव्यवहारांबाबत कुलगुरूंना ‘सुटा’ने अनेक पत्रे, निवेदने दिली. त्यांच्यासमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा चर्चा केली; परंतु, कुलगुरूंच्या कारभारात सुधारणा होण्याऐवजी गैरव्यवहारांचे प्रमाण वाढले.

गैरव्यवहार झाल्याचे मान्य करूनही अपेक्षित कारवाई करण्याबाबत कुलगुरूंची निष्क्रियता, उदासीनता स्पष्ट झाली. गेल्या महिन्यात कुलगुरूंसमवेत ‘सुटा’च्या पदाधिकाºयांची चर्चा झाली. त्यावेळी आंदोलनाबाबत अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला होता. त्यावेळी कुलगुरूंनी कारवाईचे कोणतेही आश्वासन दिले नाही; त्यामुळे ‘सुटा’ला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार आंदोलन सुरू केले आहे.

पहिल्या टप्प्यात प्राध्यापकांच्या सह्यांची मोहीम राबवून कुलपतींना निवेदन देण्यात येणार आहे. कुलगुरूंच्या कारभाराची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. विद्यापीठाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कुलगुरुंवर हे आहेत आरोपगैरव्यवहारांचे आरोप असलेल्या प्राचार्यांची वर्णीअभ्यासमंडळांवर अपात्र प्राध्यापकांचे नामनिर्देशनसदोष पदवी प्रमाणपत्रांची छपाई प्रकरणशैक्षणिक सल्लागाराची नियमित कार्यपद्धती धाब्यावर बसवून बेकायदेशीर नेमणूककुलगुरू निवासातील कार्यालय नियमबाह्यवार्षिक अंदाजपत्रकाबाबत तरतुदींचा भंगअभ्यासमंडळांवरील स्वीकृत सदस्यांचा घोळ.आंदोलनाचे टप्पेप्राध्यापकांनी काळ्या फिती लावून काम : २२ जानेवारीविद्यापीठासमोर निदर्शने : २९ जानेवारी, दुपारी तीन वाजताविद्यापीठात धरणे आंदोलन : १२ फेब्रुवारी, दुपारी एक वाजता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ