शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ देणार ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:32 IST

विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ देणार आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ देणार ‘स्टार्टअप इंडिया’ला बळइन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी मंजूर राज्य शासनाकडून इरादापत्र प्रदान

कोल्हापूर : विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ ‘स्टार्टअप इंडिया’ला बळ देणार आहे.या केंद्रासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुंबई येथे राजभवनमध्ये बुधवारी (दि. ३) झालेल्या ‘स्टार्ट-अप इंडिया महाराष्ट्र यात्रा’ उपक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. डॉ. आर. के. कामत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासनाच्या वतीने इरादापत्र (लेटर आॅफ इंटेंट) प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख उपस्थित होते.विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. कामत यांनी सांगितले की, विद्यापीठाने या इन्क्युबेशन सेंटरसाठी समृद्धी इंडस्ट्रीजचे मनीष पाटील यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता. एकूण ११ कोटी रुपयांच्या या प्रस्तावापैकी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे ही मंजुरी दिली आहे. या केंद्राचे कामकाज विद्यापीठ आणि समृद्धी इंडस्ट्रीज यांच्यातर्फे होणार आहे. पाच वर्षांच्या या प्रकल्पांतर्गत वर्षाला १५ ते २० स्टार्टअप प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांसह तळागाळातील संशोधक, सर्वसामान्य लोकांनाही आपल्या अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव सादर करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी समृद्धी उद्योगाच्या सहकार्याने जुगाडफंडा डॉट कॉम हे पोर्टल सुरू केले आहे. सिंगापूरमधील आघाडीच्या विद्यापीठाच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात आहे.

या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचा विद्यापीठ परिक्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आणि अभिनव, उपक्रमशील नागरिक यांना मोठा लाभ होईल.- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

साहाय्य करण्याचे धोरणस्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेद्वारे शासन गावोगावी उद्योगास चालना मिळण्यासाठी उद्योजक घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक आणि नवउद्योजकांना साहाय्य करण्याचे धोरण असल्याचे प्रा. कामत यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरVinod Tawdeविनोद तावडेMumbaiमुंबई