शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे; आणखी २ गुन्हे दाखल, मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

By उद्धव गोडसे | Updated: July 20, 2024 15:38 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रके तयार केल्याच्या दोन फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रके तयार केल्याच्या दोन फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) दाखल झाल्या. दिप्ती वसंत गावडे (मूळ रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. जोगेश्वरी, मुंबई) आणि प्रवीण बाबूराव शेलार (रा. कोकण नगर, चेंबूर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार केल्याची एक फिर्याद गेल्या आठवड्यात दाखल झाली होती.सावंतवाडी येथील दिप्ती गावडे या तरुणीने एका बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. संबंधित बँकेने गावडे हिची कागदपत्रे तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवल्यानंतर तिच्याकडील बी.कॉम. भाग तीनचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आणि स्थलांतर दाखला बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. हा प्रकार २१ जून २०२४ रोजी निदर्शनास आला. याबाबत विद्यापीठातील कर्मचारी प्रल्हाद बाबूराव जाखले (वय ५२, रा. कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली. दुस-या घटनेत प्रवीण शेलार याने एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याची प्रमाणपत्रे तपासणीसाठी विद्यापीठाकडे आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्याने बी.कॉम. भाग १, २ आणि ३ चे गुणपत्रक, तसेच पदवीचे बनावट प्रमाणपत्र करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. विद्यापीठाचे नाव आणि लोगोचा गैरवापर केल्याची फिर्याद कर्मचारी दीपक दत्तात्रय अडगळे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे तीन गुन्हे आठवडाभरात पोलिसात दाखल झाले, त्यामुळे यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.आणखी एक शिगाव विद्यापीठ?विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणारी टोळी शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सक्रीय होती. अनेकदा त्या टोळीवर कारवाया झाल्या. त्यानंतरही बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात होती. तशीच टोळी पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना सखोल चौकशी करावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस