शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

दिवाळीनंतर होणार शिवाजी विद्यापीठाच्या १३० परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:48 AM

महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एम. ए. (भाषा), संस्कृत, ऊर्दू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत.

ठळक मुद्देमहापूर, उशिरा प्रवेश झालेल्या अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात बदलआजपासून पहिल्या सत्रातील परीक्षांचा प्रारंभ

कोल्हापूर : महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एम. ए. (भाषा), संस्कृत, ऊर्दू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत.विद्यापीठातर्फे पहिल्या सत्रात (हिवाळी) कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुमारे सहाशे परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांतील सुमारे अडीच लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांची सुरुवात मंगळवारपासून होणार आहे.

बी.ए., बी.एस्सी., बीबीए, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा बुधवार(दि. १६)पासून होईल. सकाळी आणि दुपारी या सत्रांमध्ये परीक्षा होतील. डिसेंबरमध्ये शेवटच्या टप्प्यात एमबीए, अभियांत्रिकी, फार्मसी आणि नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.

या पहिल्या सत्रात विविध परीक्षांच्या पाच हजार प्रश्नपत्रिका या ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये परीक्षांची तयारी सोमवारी सुरू होती.विद्यार्थ्यांनी खात्री करावीपहिल्या सत्रातील परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे. अशा अभ्यासक्रमांच्या १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहेत. पूर्वनियोजनानुसार या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून होणार होत्या. सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी या बदलेले वेळापत्रक पाहून आपल्या परीक्षांची माहिती घ्यावी, खात्री करावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. जी. आर. पळसे यांनी सोमवारी केले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर