शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी सावंत यांची कर्णकथा पन्नाशीत

By admin | Updated: September 12, 2016 00:51 IST

कोल्हापुरातील पोलिस क्वार्टर्समध्ये झाला ‘मृत्युंजय’चा जन्म

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर ज्या वयात रंगीबेरंगी स्वप्नं पाहायची, त्या वयात तेविशीतील एक युवक चिंतन करीत होता. महाभारतातील कर्ण त्याच्या मनात घट्ट रुतला होता. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाचं दु:ख त्याच्या उरात दाटलं होतं. त्या तरुणानं निर्धार केला कर्णाला न्याय देण्याचा. प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर तीन महिने राहून, अखंड वाचनानंतर केलेल्या चिंतनातून कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्सच्या एका खोलीत बसून त्यानं ही कर्णकथा लिहिली. ती वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आणि शिवाजी सावंत या २७ वर्षांच्या युवकाला ‘मराठा’च्या अग्रलेखातून प्र. के. अत्रे यांनी ‘मृत्युंजयकार’ ही पदवी बहाल केली. ‘मृत्युंजय’ कादंबरीचे बुधवारी (दि. ७) सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले शिवाजी सावंत शाळकरी वयात नाटकात कृष्णाची भूमिका करतात; पण त्यांना भावतो तो कर्ण. पुढे कोल्हापुरात आल्यानंतर मेन राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहँडचे शिक्षक म्हणून काम करताना त्यांना करवीर वाचन मंदिराचा लळा लागला. महाभारतावरील विविध गं्रथ वाचताना कर्ण त्यांना अधिकच खुणावू लागला. मग त्यांनी त्या दृष्टीने वाचन सुरूच ठेवले. आता त्यांनी थेट कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला. पैशांचा प्रश्न होता. पहिला धनादेश भालजी पेंढारकर यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अगदी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत अनेकांनी याकामी मदत केली. कुरुक्षेत्राचा दौरा करून आलेल्या शिवाजीरावांनी त्यांचे मोठे भाऊ, जे पोलिस दलात कार्यरत होते, त्यांच्या दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये मुक्काम ठोकला. आतापर्यंत मनात कर्णाबद्दल जे काही साठलं होतं, ते झपाटल्यागत झरझर उतरायला सुरुवात केली. दीड हजार पानांचं हे बाड तयार झालं. कोल्हापुरात कुणी त्याला हात लावायला तयार झालं नाही. शिवाजीरावांचे मित्र आर. के. कुलकर्णी हे हस्तलिखित आणि शिवाजीरावांना घेऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले. माडगूळकरांनी कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णी यांना चिठ्ठी दिली आणि ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी पहिल्या प्रतीचे पूजन झाले. या पोलिस क्वार्टर्समधील १२ क्रमांकाच्या खोलीत ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. आज तिथे कुणी राहत नाहीत. तिथे राहणारे पोलिस हवालदार निवृत्त झाले. ज्या खोलीत मराठी साहित्यविश्वातील इतिहास घडला, तिथे आता ‘निर्धार’ या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेली शिवाजीरावांची फक्त प्रतिमा आहे. ३० आवृत्त्या, सहा भाषांमध्ये भाषांतर, इंग्रजीत अनुवादाच्या साहित्यातील ‘नोबेल’साठी नामांकन आणि लाखो वाचकांचे प्रेम मिळविणारी ही कादंबरी आता पन्नाशीची झाली आहे. कोठे, काय पहाल? ‘मृत्युंजय’ला ४९ वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात अनेक माणसं अशी भेटली की, त्यांनी सांगितलं की, मी ‘मृत्युंजय’मुळे उभा राहिलो. आत्महत्येचे विचारही मनात आलेला एखादा सांगतो की, ‘मृत्युंजय’मुळे माझा विचार बदलला. ‘मृत्युंजय’च्या इंग्रजी भाषांतराचे साहित्यातील नोबेलसाठी कोलक ात्याहून नामांकन झाले होते. एखाद्या कादंबरीमुळे माणूस आयुष्यात पुन्हा उभं राहणं हे ‘नोबेल’च आहे, असं मी त्यांना म्हणायचे. नव्या पिढीतील मुलं-मुली जेव्हा ‘मृत्युंजय’बद्दल सांगतात, तेव्हा समाधान वाटतं. - मृणालिनी शिवाजीराव सावंत