कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा जयघोष
By Admin | Updated: February 19, 2015 23:56 IST2015-02-19T23:53:22+5:302015-02-19T23:56:54+5:30
शिवजयंती निमित्त उपक्रम : शिवप्रतिमेची मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवज्योतीचे आगमन, मॅरेथॉन, आदी स्पर्धांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा जयघोष
कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोषी वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक, पूजा यासह मिरवणूक आणि विविध ठिकाणी पोवाडे, रक्तदान शिबिर, पन्हाळा, विशाळगड, पारगड, सामानगड, कलानंदीगड, सिधुदुर्ग येथून काही शिवभक्तांनी शिवज्योत आणल्या. तसेच सांयकाळी काही ठिकाणी शिवप्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांद्वारे वातावरण शिवमय झाले होते.