बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांपासून जवानांना ऊर्जा प्रेरणा मिळते त्यामुळेच जवान सीमेवरील शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज असतात. शिवाजी महाराज आमच्या रेजिमेंटचे आदर्श आहेत. भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे. शत्रू लढाईसाठी आव्हान देईल याची आम्ही प्रतीक्षा करत असतो असे मत कर्नल ऑफ रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी. जे. एस .पन्नू यांनी काढले.मराठा सेंटर मधील मराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन लेफ्टनंट जनरल पी जे एस पंन्नू यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर उपस्थित होते.तत्पूर्वी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 492 जवानांचा दीक्षांत आणि शपथविधी कार्यक्रम तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पी.जे.एस.पन्नू उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी तिरंगा आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली.नंतर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली.
'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:12 IST
भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'
ठळक मुद्देशिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना प्रेरणा : लेफ्ट जनरल पन्नूमराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन