शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

घरात साजरी केली शिवजयंती, वडणगे येथील विजय पाटील यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:09 IST

छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

ठळक मुद्देघरात साजरी केली शिवजयंतीवडणगे येथील विजय पाटील यांचा उपक्रम

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.न्यायालयामध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या विजय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची आणि कर्तृत्वाची आठवण कायम तेवत ठेवण्यासाठी वडणगे येथील आपल्या घरातील हॉलमध्ये शिवरायांची भव्य मूर्ती उभी करून त्याभोवती देखणी आरास केली आहे. ही आरास पहायला ग्रामस्थांसह अनेकजण त्यांच्या घराला भेट देत आहेत.शिवपुतळ्यासह दांडपट्टा, तोफांच्या प्रतिकृतीकलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र विजय पाटील यांनी घरात स्थापित केले असून, त्यातील दांडपट्टा, भाले, बेलाचे पान, तलवार, मोरचेल, दोन तोफा यांच्या प्रतिमा स्वत: त्यांनी बनवल्या आहेत. याशिवाय कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हुबेहुब प्रतिकृती आणि दगडी चबुतराही घरात तयार करून घेतला आहे. पुढील वर्षी भवानी तलवारीची प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

केवळ वर्षातून एकदा शिवजयंती साजरी न करता रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कर्तृत्वाचे स्मरण व्हावे व प्रत्येकजण शिवविचाराने प्रेरित व्हावा, यासाठीच ही धडपड आहे.विजय शिवाजीराव पाटील,वडणगे(वाहनचालक, न्यायालय, कोल्हापूर

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर