शिवाजी बँक अपहार प्रकरणी २९ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: August 25, 2015 00:19 IST2015-08-25T00:18:15+5:302015-08-25T00:19:59+5:30

संचालक, कर्मचारी जबाबदार : १३ कोटी ३१ लाखाचा भ्रष्टाचार,बँक अवसायानात

Shivaji Bank Approval Case: 29 People Crime | शिवाजी बँक अपहार प्रकरणी २९ जणांवर गुन्हा

शिवाजी बँक अपहार प्रकरणी २९ जणांवर गुन्हा

गडहिंग्लज : अवसायानात असलेल्या येथील श्री शिवाजी सहकारी बँकेचे १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०१० अखेर फेरलेखापरीक्षण करून १३ कोटी ३१ लाख ३२ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी २९ जणांविरोधात लेखापरीक्षकांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दिली. जनरल मॅनेजर, विविध शाखांचे शाखाधिकारी, वसुली अधिकारी, आदींसह संचालकांचा यामध्ये समावेश आहे.
पोलिसांतील माहितीनुसार अवसायानात गेल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडील आदेशानुसार डी. ए. चौगुले यांनी बँकेचे फेरलेखापरीक्षण केले. त्यामध्ये संचालकांसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर करीत अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आयडीबीआय बँकेतून शिवाजी बँकेच्या खात्यावरील रक्कम रोखीने काढणे, त्याची किर्दीला नोंद न घेणे, कोट्यवधीची रक्कम कोणत्याही पावतीशिवाय कीर्दवहीला खर्च टाकणे, यंत्रमाग नसताना सबसिडी मिळविणे, कर्जाचे दस्ताऐवज नसताना रक्कम खर्च टाकणे, कर्ज खात्यावर येणे बाकी असताना ना देय प्रमाणपत्र देणे, आदींसह विविध प्रकाराने अपहार झाल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले.
१४ आॅगस्ट रोजी लेखापरीक्षकांनी आपला फेरलेखापरीक्षण अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केला असून, त्यांनी आज २९ जणांविरोधात तब्बल ४४ पानांची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके याबाबत अधिक तपास करीत आहेत.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सुधीर रामचंद्र देसाई (जनरल मॅनेजर), आबासाहेब विठोबा देसाई (गडहिंग्लज शाखाधिकारी), सुधाकर शामराव देसाई (अकाऊंट/ शाखाधिकारी गडहिंग्लज), कृष्णा बाळाप्पा कांबळे (कोल्हापूर शाखाधिकारी), तुकाराम गणपती पाटील (क्लार्क-शाखा कोल्हापूर), सुनील श्रीकांत मोकाशी (क्लार्क / कॅशिअर शाखा कोल्हापूर), संजय रामचंद्र कर्णेकर (कॅशिअर-शाखा गडहिंग्लज), गजानन शिवराम कळेकर (शाखाधिकारी शाखा हरळी), अरुण शामराव देसाई (वसुली अधिकारी), विजय आनंदा शिंदे (कॅशिअर-शाखा गडहिंग्लज), आप्पासाहेब शिवाजी नार्वेकर (क्लार्क - मुख्यालय-गडहिंग्लज), संचालक प्रमोद जयसिंगराव रणनवरे, बाबासाहेब सखगोंडा पाटील, दिलीप श्रीपतराव माने, तानाजी ईश्वर मोहिते, प्रकाश भीमराव चव्हाण, किसनराव विठ्ठल कुराडे, दत्ताजीराव रामराव
नलवडे, बाजीराव गणपतराव देसाई, किरण धोंडिराम कदम, बाळासाहेब कृष्णराव चव्हाण, भरत बापूगोंडा पाटील, संजय तानाजीराव मोकाशी, चंद्रकांत मायाप्पा कांबळे, गुरुनाथ भीमराव पाथरवट, गोविंदराव सटवोजी देसाई व संचालिका प्रेमला खोत व विजयमाला विजयसिंह रणनवरे.
 

Web Title: Shivaji Bank Approval Case: 29 People Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.