गारगोटी येथील सुदर्शन नगरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST2021-02-21T04:47:17+5:302021-02-21T04:47:17+5:30
गारगोटी, सालाबादप्रमाणे गारगोटी येथील सुदर्शन नगरात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त बाल शाहिरांचा कार्यक्रम सांगावा ...

गारगोटी येथील सुदर्शन नगरात शिवजयंती उत्साहात
गारगोटी,
सालाबादप्रमाणे गारगोटी येथील सुदर्शन नगरात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त बाल शाहिरांचा कार्यक्रम सांगावा शिवबाचा व्हाया लिटल चम्प हा कार्यक्रम रात्री संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंतो यांच्या हस्ते झाले. यावेळी भुदरगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अमितदादा देसाई, प्रा. भिकाजी मगदूम, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, परीस स्पर्श ज्वेलर्सचे आबासो पावले, राजे मेन्सवेअर्सचे संदीपराज देसाई, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, अरुण गायकवाड, प्रीतम देवार्डे, सुशांत माळवी, सहदेव सावंत व शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
फोटो चांगला नाही
फोटो ओळ
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अमित देसाई. सोबत प्रवीणसिंह सावंत, नंदकुमार शिंदे, प्रकाश वास्कर, आदी.