कुंभोज येथे शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST2021-02-20T05:12:17+5:302021-02-20T05:12:17+5:30
कुंभोज : छत्रपती शिवाजी महाराज की जय, ...

कुंभोज येथे शिवजयंती उत्साहात
कुंभोज : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जयभवानी जयशिवाजी अशा जयघोषात शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती कुंभोज येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त बसस्थानक चौकात शिवसेना युवासेनेच्या वतीने ५१ फूट भगव्या ध्वजाचे अनावरण ग्रा.पं. सदस्य अशोक आरगे यांच्या हस्ते झाले.
शिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन नूतन पोलीस उपनिरीक्षक अरुण भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच दाविद घाटगे, किरण माळी, ॲड. अमित साजनकर, डॉ. सत्यजित तोरस्कर, उमेश आरगे, नितीन रोहिले, विश्वजित माने, जहांगीर हजरत, सुरेश भगत, कैलास चव्हाण, संतोष सपकाळ आदींसह शिवभक्त उपस्थित होते.
ग्रामपंचायत कुंभोज येथे शिवप्रतिमेचे पूजन सरपंच माधुरी घोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दाविद घाटगे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी ए.एस. कठारे, तसेच कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवविचार चळवळ यांच्या वतीने आयोजित विनायक रेडेकर यांच्या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घेतला. शिवजयंती विविध उपक्रमांनी शांततेत पार पाडण्यासाठी पवन तोरस्कर, ऋषिकेश साजनकर, पवन मिसाळ, प्रतीक घोरपडे, अरुण जमणे, काकासो मिसाळ आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी-कुंभोज ( ता.हातकणंगले)पैकी शिवाजीनगर येथे नूतन पोलीस उपनिरीक्षक अरुण भोसले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. यावेळी किरण माळी, डाॅ. सत्यजित तोरस्कर, ॲड. अमित साजनकर, जहाँगीर हजरत, तसेच शिवसैनिक.