इचलकरंजी : शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय कांबळे, उद्धवसेनेचे शहरप्रमुख सयाजी चव्हाण आणि त्याच पक्षातील युवा पदाधिकारी शिवाजी पाटील हे तिघे महायुतीमधील विविध घटक पक्षांच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिव-शाहू आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही पक्षांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. शिव-शाहू आघाडीतील मुख्य घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष कांबळे हे भाजपच्या वाटेवर असून, हाळवणकर गटासोबत त्यांची चर्चा झाल्याचे समजते. त्या माध्यमातून त्यांना उमेदवारीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासह पक्षप्रवेश करण्याचे नियोजनही सुरू आहे.
त्याचबरोबर उद्धवसेनेचे शहरप्रमुख सयाजी चव्हाण हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना उमेदवारीसाठी जागा निर्माण केल्यानंतर त्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तसेच उद्धव सेनेतील युवा पदाधिकारी पाटील हेही भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत चर्चेत असल्याचे समजते.
चर्चेला उत्तर नाहीगेल्या दोन दिवसांपासून संजय कांबळे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला शुक्रवारी अन्य सूत्रांकडून दुजोरा मिळाला. याबाबत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
शिंदेसेनेबाबत चर्चा झाली असली तरी प्रवेशाबाबत अद्याप निश्चित काहीच नाही. योग्यवेळी तुम्हाला माहिती देऊ. - सयाजी चव्हाणभाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यासह सर्वच पक्षांसोबत आपले चांगले संबंध आहेत. कामानिमित्त भेटी होत असतात. परंतु प्रवेशाबाबत अद्याप निश्चित नाही. ठरल्यास नक्कीच सांगू. - शिवाजी पाटील
Web Summary : Ahead of Ichalkaranji Municipal elections, key Shiv-Shahu alliance members are considering joining the MahaYuti. Congress city president, Uddhav Sena chief, and a youth leader are exploring options with BJP and Shinde Sena, causing political stir.
Web Summary : इचलकरंजी नगर निगम चुनाव से पहले, शिव-शाहू गठबंधन के प्रमुख सदस्य महायुति में शामिल होने पर विचार कर रहे हैं। कांग्रेस शहर अध्यक्ष, उद्धव सेना प्रमुख और एक युवा नेता भाजपा और शिंदे सेना के साथ विकल्प तलाश रहे हैं, जिससे राजनीतिक हलचल मची है।