शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

शिवसेनेचा इशारा : कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार शनिवारी बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:03 IST

Shivsena Karnataka Kolhapur- बेळगाव महानगरपालिकेसमोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवावा तसेच मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत अन्यथा शनिवारी (दि. २०) एक दिवसांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद केले जातील, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देशिवसेनेचा इशारा : कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार शनिवारी बंद पाडणार मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवा, निळा पिवळा झेंडा हटवा

कोल्हापूर : बेळगाव महानगरपालिकेसमोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवावा तसेच मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत अन्यथा शनिवारी (दि. २०) एक दिवसांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद केले जातील, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.सीमा भाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी सूचना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून भाजप पुरस्कृत कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आणि कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे देवणे व पवार यांनी सांगितले.मराठी भाषिक तरुणांवर पोलीस ठाण्यातून खोटे गुन्हे दाखल करत आहे. आंदोलने चिरडून टाकत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात बंदी घालत आहेत. भाषिक तेढ निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे जर थांबले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल, असे देवणे यांनी सांगितले यावेळी उपप्रमुख सुजित चव्हाण, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनूर, प्रवीण तेजब, सचिन गोरले उपस्थित होते.

मुख्य सचिवांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी

सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेचे खासदार नितीन राऊत यांच्यामार्फत पत्र देण्यात आले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या मुख्य सचिवांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.एक दिवसांसाठी असे असेल आंदोलन..

  • कन्नड लोकांचे व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स, बांधकामे, वाहतूक बंद पाडणार.
  • कर्नाटकातून येणारी एस.टी. वाहतूक, खासगी वाहने बंद
  • कन्नड व्यावसायिकांनी दुकाने, हॉटेल्स सुरूच ठेवली तर शिवसेना स्टाइलने बंद पाडू
  • गृहमंत्री अमित शहांना पत्र

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव