शिवसेनेचे सर्वाधिक सरपंच, सदस्य निवडून आणा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:58+5:302020-12-29T04:22:58+5:30

कोल्हापूर : ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य जास्तीत जास्त शिवसेनेचे निवडून येतील यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कमंत्री ...

Shiv Sena's highest Sarpanch, elect members; | शिवसेनेचे सर्वाधिक सरपंच, सदस्य निवडून आणा;

शिवसेनेचे सर्वाधिक सरपंच, सदस्य निवडून आणा;

कोल्हापूर : ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य जास्तीत जास्त शिवसेनेचे निवडून येतील यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कमंत्री उदय सामंत यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आजी-माजी आमदार, खासदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख, त्याचबरोबर खासदार, आमदार यांची मते त्यांनी जाणून घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील अधिकाधिक सरपंच आणि सदस्य हे शिवसेनेचे निवडून येतील यासाठी कामाला लागा, सर्वांनी समन्वय राखून काम करा, अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या.

यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's highest Sarpanch, elect members;