कोरोनाशी लढणाऱ्यांना शिवसेनेचे कृपाछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:49+5:302021-07-24T04:16:49+5:30

उचगाव : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावतात, त्यांच्या डोक्यावर नेहमीच शिवसेनेचे कृपाछत्र राहील, असे अभिवचन शिवसेनेचे ...

Shiv Sena's grace to those who fight against Corona | कोरोनाशी लढणाऱ्यांना शिवसेनेचे कृपाछत्र

कोरोनाशी लढणाऱ्यांना शिवसेनेचे कृपाछत्र

उचगाव : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावतात, त्यांच्या डोक्यावर नेहमीच शिवसेनेचे कृपाछत्र राहील, असे अभिवचन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिले.

कोरोनाशी चार हात करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका आणि पत्रकार यांना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी उचगाव (ता. करवीर) येथे करवीर शिवसेनेच्या वतीने संबंधित सर्व घटकांची संयुक्त बैठक झाली. त्यात संजय पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख राजू यादव होते. यावेळी छत्री, रेनकोट व प्रमाणपत्र जिल्हाप्रमुख पवार व राजू यादव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पोपट दांगट, दीपक पाटील, दीपक रेडेकर, विनायक जाधव, अर्चना करी, महादेव चव्हाण, स्वाती यादव, संतोष चौगुले, बाळासाहेब नलवडे, विराग करी, योगेश लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रा.पं. सदस्य महेश खांडेकर, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव यांनी संयोजन केले.

फोटो ओळ: उचगाव (ता. करवीर) येथे कोरोनाशी चार हात करणाऱ्या संबंधित घटकांच्या संयुक्त बैठकीत बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार. शेजारी राजू यादव, दीपक रेडेकर, दीपक पाटील, पोपट दांगट.

Web Title: Shiv Sena's grace to those who fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.