वडगावात शिवसेनेचे केंद्र शासन व मंत्री दानवे यांच्या निषेधार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:21+5:302020-12-15T04:41:21+5:30
यावेळी जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान व हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील यांनी केंद्र सरकार व मंत्री ...

वडगावात शिवसेनेचे केंद्र शासन व मंत्री दानवे यांच्या निषेधार्थ आंदोलन
यावेळी जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान व हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील यांनी केंद्र सरकार व मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त केला. हे आंदोलन वडगाव शहरप्रमुख नगरसेवक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी तालुका उपप्रमुख राजू पाटील, काकासो पाटील, जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील, दीपक वासुदेव, सुनील चव्हाण, बबलू खाटीक, विशाल पाटील, यासिर मोमीन, प्रवीण पाटील, हेमलता मुसळे, अनिता बुचडे, अश्विनी पाडळकर, आदी उपस्थित होते.
●●फोटो : पेठवडगाव : येथील पालिका चौकात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान, हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शहरप्रमुख संदीप पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.(छाया : क्षितिज जाधव)