कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेती विधेयकाविरोधात शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. इडापीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, मोदी हटाव - किसान बचाव आदी घोषणांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी केंद्र सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली.शेती विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली खानविलकर पेट्रोल पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. बड्या उद्योगपतींना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे पाप भाजपने केले आहे.विजय देवणे म्हणाले, भाजप सरकारचे धोरण भांडवलदारधार्जिणे आहे. मात्र त्याचे समर्थक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे करतात, हेच शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा सुपुत्र म्हणून छाती बडवून घेणारे दानवे ह्यमाल द्या - पैसे घ्याह्ण अशी शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहे. त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी रस्त्यावर फिरू देणार नाहीत.शेती विधेयक रद्द करा, वीज व पाणी मोफत द्या, बी-बियाणे व खते अनुदान द्या, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, प्रकाश पाटील, शिवाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, अविनाश शिंदे, किरण कोकीतकर, राजू यादव, विराज पाटील, संभाजी भोकरे, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, मंजित माने, आदी उपस्थित होते.
शेती विधेयकाविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 17:08 IST
Shiv Sena, bullock cart morcha, Agriculture Bill, kolhapurnews केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेती विधेयकाविरोधात शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. इडापीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, मोदी हटाव - किसान बचाव आदी घोषणांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी केंद्र सरकारसह राज्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली.
शेती विधेयकाविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
ठळक मुद्देशेती विधेयकाविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चाभाजप नेत्यांना शेतकरी रस्त्यावर फिरू देणार नाहीत