शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सुजित चव्हाण यांचा बोलविता धनी कोण?; व्ही.बी. पाटील यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 12:14 IST

मनोज जरांगे-पाटील यांच्या कोल्हापुरातील सभेवर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी केला होता प्रश्न

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मनोज जरांगे-पाटील यांची झालेली सभा पक्षविरहित होती. या सभा महाराष्ट्रभर जरांगे यांच्या बॅनरखाली घेतल्या जातात, हे सुजित चव्हाण यांना माहीत नाही का? एक सत्ताधारी पक्षाचे प्रमुख या नात्याने आपण काढलेली प्रेसनोट ही आपली नसून, आपला बोलविता धनी कोण आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी सोमवारी उपस्थित केला.जरांगे पाटील यांच्या सभेत राष्ट्रवादीशी संबंधित शाहू छत्रपती व स्वराज संघटनेचे संस्थापक संभाजीराजे हे उपस्थित कसे, असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी विचारला होता. त्याला पाटील यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले.पत्रात म्हंटले आहे की, जरांगे -पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ही सर्व मंडळी लोकसमुदायात बसली होती. त्यावेळी आपण घरी बसला होता हेच का तुमचे मराठा समाजावरचे प्रेम. यदा कदाचित पक्षाच्या सूचनेवरूनच आपण आला नसाल. छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही पक्षाचे सभासद नाहीत. ते पुरोगामी विचाराचे पाईक आहेत. जरांगे पाटील यांनीच शाहू महाराजांना सभेसाठी निमंत्रित केले होते. संभाजीराजें सभेत लोकसमुदायासोबत बसले असताना जरांगे -पाटील यांनी त्यांना व्यासपीठावर यावे, अन्यथा मला खाली यावे लागेल, असे सांगितले.या घटना तुम्हाला घरात बसून कशा कळतील, असा टोमणाही पाटील यांनी चव्हाण यांना लगावला. मनोज जरांगे पाटील हा मराठा समाजाला मिळालेला स्वच्छ आणि प्रामाणिक चेहरा आहे. उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी उभा आहे. आपणही त्यांच्या पाठीशी उभे राहा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस