गडहिंग्लजला इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:07+5:302021-02-06T04:44:07+5:30
गडहिंग्लज : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गडहिंग्लज येथे शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. येथील प्रांत कार्यालयासमोर दुचाकींची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ...

गडहिंग्लजला इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शने
गडहिंग्लज : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गडहिंग्लज येथे शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. येथील प्रांत कार्यालयासमोर दुचाकींची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्री मोदी व भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करून या दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीच्या निषेधाचे फलक आणि शिवसेनेचे भगवे ध्वज हातात घेत दसरा चौक ते प्रांत कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, दिलीप माने, संतोष संकपाळ, अशोक खोत, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, मंगल जाधव सहभागी झाले होते.
--------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे शिवसेनेतर्फे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीत दुचाकी ठेवून निदर्शने करण्यात आली. यावेळी विजय देवणे, सुनील शिंत्रे, दिलीप माने आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०५०२२०२१-गड-०३