शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ.

कोल्हापूर : आम्ही या सर्वांना प्रेम दिलं, संपूर्ण विश्वास ठेवला, मानाची पदं दिली. इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं. तरीही यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हीच सांगा आमचं नेमकं काय चुकलं, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे मिरजकर तिकटीला झालेल्या सभेत शिवसैनिकांना विचारला.रात्री भर पावसात आदित्य यांनी व्यासपीठावरून खाली येऊन उपस्थितांशी संवाद साधला. एकीकडे आपली बाजू मांडतानाच हा माणुसकीचा घात असल्याचे सांगत शिंदे गटाच्या आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. या सभेला जल्लोषी प्रतिसाद मिळाला. या सभेत कोल्हापूर आणि निपाणीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.फडफडणारे भगवे ध्वज, शिवसेना गीत आणि एकापेक्षा एक आक्रमक भाषणे सुरू असताना ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागत स्वीकारल्यानंतर सर्वांना अभिवादन करून आदित्य भर पावसात खाली आले. त्यांनी एका खुर्चीवर उभारूनच आपले अर्ध्या तासाचे भाषण पूर्ण केले. शिवसैनिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी साधलेल्या शिवसैनिकांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे आदित्य यांना दाद दिली.ठाकरे म्हणाले, हे बंड आहे, उठाव असे म्हणतात. परंतु हे सर्व जण गद्दार आहेत आणि गद्दार हीच त्यांची ओळख राहणार आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा, वाढतच चाललेली भूक यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. गेलाच आहात तर जा. पण तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा हे माझे आव्हान आहे.ठाकरे म्हणाले, ज्यांनी कोरोना काळात चांगले काम केले, ज्यांच्या काळात जातील दंगली झाल्या नाहीत. ते उध्दव ठाकरे आणखी मोठे झाले तर आपले काय अशी भीती काही जणांना वाटत होती. यातूनच हे घडले.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, काही लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी बाजूला गेले. परंतु जनता, शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे. देवमाणसाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला आहे. मी हे आजारी असताना पुष्पगुच्छ घेऊन दवाखान्यात भेटायला गेलो. परंतु उशीखाली यांनी खंजीर ठेवला होता हे मला माहिती नव्हते, असा टोला पवार यांनी राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, विशाल देवकुळे यांचीही भाषणे झाली. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख रवी इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सभेला आदेश बांदेकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, नियाज खान, महेश उत्तुरे, नवेज मुल्ला, बाजीराव पाटील, राजू यादव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले..

गद्दारांमधील काही जणांना फसवून नेण्यात आलं आहे. त्यांनाही आता खरोखरच आपण उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटत असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.साडेतीन गद्दार..खासदार विनायक राऊत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ आहे. आजऱ्यात एकाचा पंचनामा केला. इथंही एक अर्धवटराव आहे. नकली धर्मवीरही आहे. आनंद दिघे खरोखरच धर्मवीर होते. हे नकली धर्मवीर दिल्लीला चाटूगिरी करायला निघाले आहेत. केवळ आणि केवळ उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी हा सर्व डाव आहे.

प्रचंड उत्साह

आदित्य ठाकरे यांच्या या सभेवेळी उपस्थितांचा प्रचंड उत्साह जाणवत होता. घोषणा, फुटीरांबद्दल शेरेबाजी शेवटपर्यंत सुरू होती. ठाकरे यांनी अतिशय सहज पध्दतीने संवाद साधत, प्रश्न विचारत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे