शिवसेनेकडून ‘सीपीआर’ला ५० लाखांचे व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:51+5:302021-05-24T04:21:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने रविवारी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ५० लाखांचे व्हेंटिलेटर देण्यात आले. राज्य नियोजन ...

Shiv Sena donates Rs 50 lakh to CPR | शिवसेनेकडून ‘सीपीआर’ला ५० लाखांचे व्हेंटिलेटर

शिवसेनेकडून ‘सीपीआर’ला ५० लाखांचे व्हेंटिलेटर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने रविवारी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ५० लाखांचे व्हेंटिलेटर देण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पाच व्हेंटिलेटर सुपुर्द केले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार सामाजिक बांधीलकीतून शिवसेना नेहमी काम करीत आहे. गतवर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या लढ्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अविरत प्रयत्न करीत आहे. ‘सीपीआर’मध्ये जिल्ह्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सीमाभागातून रुग्ण दाखल होत असल्याने येथे व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. यासाठी पाच व्हेंटिलेटर दिले असून, आगामी काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहू. प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. विजय बर्गे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, अजित माेरे, राजू हुंबे, ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारुगले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : शिवसेनेकडून रविवारी सीपीआर रुग्णालयाला ५० लाखांचे व्हेंटिलेटर देण्यात आले. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, नंदकुमार मोरे, राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आदी उपस्थित होते. (फोटो-२३०५२०२१-कोल- सीपीआर)

Web Title: Shiv Sena donates Rs 50 lakh to CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.