शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

By Admin | Updated: February 24, 2017 00:16 IST2017-02-24T00:16:30+5:302017-02-24T00:16:30+5:30

विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी : फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने अवघा परिसर दणाणला

Shiv Sena district chief's meeting at the residence of Shiv Sena | शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी भेट घेऊन जल्लोष केला. या ठिकाणी गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या विजयी घोषणा व फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला.
जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणांचे निकाल लागतील तसे शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते गुलाल उधळतच या ठिकाणी येत होते. शिवसेनेचा जयघोष आणि फटाक्यांची आतषबाजीने हा परिसर दणाणून गेला. जिल्हा परिषदेच्या शिये मतदारसंघातून विजयी झालेल्या मनीषा कुरणे यांनी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाप्रमुख संजय पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून विजयी झालेले उमेदवार कार्यकर्त्यांसह या ठिकाणी येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह यावेळी दिसत होता. यावेळी शिवसेनेचे कामगार सेना जिल्हाप्रमुख आप्पा पुणेकर, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, प्रवीण पालव, पप्पू कोंडेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena district chief's meeting at the residence of Shiv Sena