शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशन: भगवे ध्वज, फलक, कमानींनी शहर व्यापले; लोकसभेसाठी वातावरण निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:25 IST

निवासासाठी शासकीय विश्रामगृहे आणि शहरासह आसपासच्या भागातील सर्वच हॉटेल्स आरक्षित करण्यात आली

कोल्हापूर : शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने मोठी वातावरण निर्मिती केली आहे. शहरात मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सुमारे ४० कमानी, १०० होर्डिंग आणि ७०० फलक उभारण्यात आले आहेत. चौकाचौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. विमानतळापासून अधिवेशन स्थळापर्यंत तसेच अंबाबाई मंदिरापर्यंत आणि शहरातील प्रमुख चौकात लक्षवेधी फलक लावले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे हे शिवसेनेचे पहिले अधिवेशन असून त्यादृष्टीने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवासासाठी शासकीय विश्रामगृहे आणि शहरासह आसपासच्या भागातील सर्वच हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहेत. हॉटेल्सवरून अधिवेशन ठिकाणी पोहोचविण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी युवा सेनेवर सोपविण्यात आली आहे. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन करण्यात येत आहे.अधिवेशनाला येणाऱ्या सर्वांची जेवण, नाष्ट्याची व्यवस्थाही अधिवेशनस्थळी करण्यात आली आहे. त्यासाठी दोन प्रशस्त मंडप महासैनिक दरबार मैदान येथे घालण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारी राजेश क्षीरसागर यांनी या सर्व सुविधांची पाहणी करून नियोजनाबाबत सूचना दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पीयूष चव्हाण, गणेश रांगणेकर, अंकुश निपाणीकर, नीलेश हंकारे, अर्जुन आंबी, रियाज बागवान उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे