अर्जुनवाडमध्ये शिवसेनेकडून सरपंच, उपसरपंचाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:10+5:302021-02-05T07:05:10+5:30
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ...

अर्जुनवाडमध्ये शिवसेनेकडून सरपंच, उपसरपंचाचा दावा
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे संमिश्र उमेदवार निवडून आले आहेत. आरक्षण कोणतेही असले तरी, सरपंच व उपसरपंच शिवसेनेचा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील एक गट काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी मिळून आघाडी केली, तर शिवसेनेतील दुसऱ्या गटाने बरेच छुपे उमेदवार उभे केले होते, तर भाजपा व शेतकरी संघटना यांनीही स्वबळावर निवडणूक लढवली. महाआघाडी आणि शिवसेनेचा दुसरा गट आपलाच सरपंच व उपसरपंच होण्याचा दावा करीत असले तरी, काही अपवाद वगळता बरेच सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वीचा या ग्रामपंचायतीचा इतिहास पाहता, ज्यांनी सत्ता भोगली त्या पक्षाने व गटाने सदस्य फोडून सत्ता मिळवली आहे. अपक्षांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते निवडून आले आहेत. अद्यापही अर्जुनवाडचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर नसले तरी, सरपंच पदाची आरक्षण सोडत अपक्षाच्या माथी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एका गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. त्यांच्याशी अपक्ष हातमिळवणी करून परंपरागत गटाचा छेद घेण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष सरपंच निवडीवेळी चित्र स्पष्ट होणार आहे.