शिवसेना जनतेच्या समस्येचा आवाज बनली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:40+5:302021-07-16T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - कोल्हापूर जनतेचा टोलचा प्रश्न असू दे अथवा हद्दवाढीचा, महापुराची समस्या असू दे अथवा महामारी ...

शिवसेना जनतेच्या समस्येचा आवाज बनली
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे - कोल्हापूर जनतेचा टोलचा प्रश्न असू दे अथवा हद्दवाढीचा, महापुराची समस्या असू दे अथवा महामारी कोरोनाच्या काळात तर रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत शिवसैनिकांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून शिवसैनिकांची आज प्रतिमा आहे. यामुळे पक्ष बांधणीत सामान्य जनतेला समाविष्ट करून पक्षबांधणीला गती देण्याचे आवाहन मा. आ. चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्त्यांना केले. कोपार्डे, खुपिरे गावातील शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित सभेत नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय पोवार होते.
जिल्हाप्रमुख संजय पोवार म्हणाले, शिवसैनिकांच्या रक्तातच चळवळ आहे. यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय सहन होत नाही. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घर तेथे शिवसेना पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी कोविड योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. माजी जि. प. सदस्य विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. जी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी
कुंभीचे संचालक संजय पाटील, गोकुळ संचालक एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, हर्षल सुर्वे, मनजित माने व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ कोपार्डे शिवसेना
फोटो
कोपार्डे (ता. करवीर) येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी संबोधित केले. यावेळी संजय पोवार, बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते.