आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याचे शिवसैनिकांनी केले पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:42+5:302021-06-25T04:18:42+5:30

बावीस वर्षांनंतर साकारत असलेल्या आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या श्रेयवादात शिवसेनेने उडी घेतली आहे. प्रकल्पावर जाऊन आज (गुरुवारी) शिवसेनेने पाणीपूजन ...

Shiv Sainiks worship the water of Ambeohol project | आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याचे शिवसैनिकांनी केले पूजन

आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याचे शिवसैनिकांनी केले पूजन

बावीस वर्षांनंतर साकारत असलेल्या आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या श्रेयवादात शिवसेनेने उडी घेतली आहे. प्रकल्पावर जाऊन आज (गुरुवारी) शिवसेनेने पाणीपूजन केले.

राष्ट्रवादी, भाजप यांच्यात श्रेयवादातून कलगीतुरा सोशल मीडियावर रंगला असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली. हा धागा पकडून शिवसेनेने मात्र पाणी पूजन केले.

शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये असल्याने अपुरे पुनर्वसन पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी पूजनाच्या निमित्ताने सांगितले.

प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय पाटील यांच्याहस्ते, शिवसेना उपसंघटक नगरसेवक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी दगडू कांबळे, प्रमोद घाटगे, संजय डोंगरे, किरण दिवेकर, भिकाजी गोडसे, रोहित शेंडे, संजय कांबळे, महादेव पोवार आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्पाच्या (ता. आजरा) येथील पाण्याचे शिवसेनेतर्फे पूजन करण्यात आले. यावेळी संजय पाटील, संभाजी पाटील, युवराज पोवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : २४०६२०२१-गड-०५

Web Title: Shiv Sainiks worship the water of Ambeohol project