शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना तिसऱ्यांदा PM करायचंय; शिवसेनेच्या अधिवेशनात CM शिंदेंसह शिवसैनिकांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:18 IST

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली.

Eknath Shinde Shivsena ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा शुभारंभ आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात करण्यात आला. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडली. याच अधिवेशनात शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे ४८ उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, तसेच राज्यातील हजारो पदाधिकारीही उपस्थित होते.

शिवसेनेच्या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे, यासाठी लागणारे सर्वाधिकार पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.  

शिवसेनेच्या अधिवेशात झालेले ठराव खालीलप्रमाणे

१. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकी‍र्दीबाबत अभिनंदन.२. देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन.३. राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन४. लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात येत आहेत.५. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा