शिवसैनिक जिद्दीने महापालिकेची निवडणूक जिंकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:54+5:302021-01-09T04:20:54+5:30

कोल्हापूर : कोणत्याही निवडणुकीतील पराभवाने शिवसैनिक खचून जात नाही, तर तो पराभवातून पुन्हा नव्या उमेदीने, जिद्दीने जिंकण्यासाठीच उभा राहतो, ...

Shiv Sainik will stubbornly win the municipal elections | शिवसैनिक जिद्दीने महापालिकेची निवडणूक जिंकेल

शिवसैनिक जिद्दीने महापालिकेची निवडणूक जिंकेल

कोल्हापूर : कोणत्याही निवडणुकीतील पराभवाने शिवसैनिक खचून जात नाही, तर तो पराभवातून पुन्हा नव्या उमेदीने, जिद्दीने जिंकण्यासाठीच उभा राहतो, याची प्रचिती महानगरपालिकेच्या निवडणुकीत येईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री शिवसैनिकांसमोर बोलताना व्यक्त केला.

राज्यातील सर्व ड वर्ग महानगरपालिका व नगरपालिकांसाठी एकत्रित बांधकाम नियमावली मंजूर केल्याबद्दल मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरातील तमाम शिवसैनिक तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी क्षीरसागर यांच्याहस्ते चांदीची तलवार भेट देऊन मंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत दुर्दैवाने चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील यांचा पराभव झाला. पण शिवसैनिक अशा पराभवाने खचत नाही. तो पुन्हा नव्या दमाने, जिद्दीने उभा राहतो आणि जिंकतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याची प्रचिती येईल, असे शिंदे म्हणाले.

महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. आपल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणायचे आहे. आपणाला निवडणूक नवीन नाही. महापालिकेच्या निवडणुकीत मेहनत घ्या. तुम्ही जिवाचे रान करा. माझ्याकडे नगरविकास खाते आहे. भविष्यकाळात विकास कामांना निधी कमी पडणार नाही, याची काळजी मी घेतो, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

- दोन वॉर्डांना अडीच कोटी

मंत्री शिंदे यांनी शिवालय कार्यालयाच्या परिसरातील दोन प्रभागांना अडीच कोटींचा निधी विकास कामांकरिता उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर केले.

- हीच वेळ शिवसेना महापौर करण्याची

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ‘हीच वेळ शिवसेनेचा महापौर करण्याची आहे’ ही टॅगलाईन घेऊन आम्ही महापालिकेच्या निवडणुकीत उतरत असल्याचे सांगितले. मागच्या निवडणुकीत आमचे पाच आमदार पडले, परंतु पुढील निवडणुकीत दहा आमदार निवडून आणू, असा निर्धार क्षीरसागर यांनी केला.

(- फोटो ओळी स्वतंत्र दिल्या आहेत- एकनाथ शिंदे सत्कार या नावाने टाकली आहे.)

यावेळी शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नियाजखान, राहुल चव्हाण, वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सुनील जाधव उपस्थित होते.

Web Title: Shiv Sainik will stubbornly win the municipal elections