शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शिवजयंती मिरवणुक :गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 11:05 IST

gadhinglaj Shivjayanti CoronaVirus Kolhapur Police- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणुक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ११ नगरसेवक मिळून २१ जणांवर गडहिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच मिरवणुकीतील चित्ररथांच्या १८ ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवजयंती मिरवणुक :गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा उपनगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांचा समावेश,१८ वाहनांवरही कारवाई

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणुक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ११ नगरसेवक मिळून २१ जणांवरगडहिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच मिरवणुकीतील चित्ररथांच्या १८ ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, नितीन देसाई, उदय पाटील, नरेंद्र भद्रापुर, दीपक कुराडे, नगरसेविका सुनिता पाटील, वीणा कापसे, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे व शशिकला पाटील, प्रकाश तेलवेकर, बाळासाहेब भैसकर, सागर पाटील, शिवाजी कुराडे, इम्रान मुल्ला, विनोद लाखे, लता पालकर यांचा समावेश आहे.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी, कोविड १९ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास व मिरवणुका काढण्यास मनाई केली होती.याबाबत पोलीसांनी तोंडी व लेखी सूचना दिल्या होत्या.तरीदेखील बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून शिवजयंतीची मिरवणुक काढण्यात आली.दरम्यान,मिरवणुक दसरा चौकात आल्यानंतर चित्ररथांचे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन वाहतुकीत अडथळा निर्माण केला आणि जमाव पांगविणार्‍या पोलीसांशी हुज्जत घातली. हेड कॉन्स्टेबल संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसनाईक रविकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसShivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या