वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST2021-02-20T05:12:36+5:302021-02-20T05:12:36+5:30

कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ...

Shiv Jayanti celebration on behalf of Wakare Gram Panchayat | वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी

वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी

कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन विठ्ठल पाटील (वस्ताद) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सई पाटील हिने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि आजची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते. यावेळी उपसरपंच शारदा पाटील, गणेश गुरव, विजय पोवार, सचिन पोवार, महादेव पाटील, तानाजी चौगले, चंद्रकांत पाटील, सदाशिव कुंभार, आनंदा पाटील, सर्व सदस्य, मुख्याध्यापक बीके चव्हाण, डॉ. श्वेता तोडकर, तलाठी संध्या कुंभार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार उपसरपंच शारदा पाटील यांनी मानले.

फोटो

वाकरे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विठ्ठल पाटील (वस्ताद), सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच शारदा पाटील, सर्व सदस्य.

Web Title: Shiv Jayanti celebration on behalf of Wakare Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.