मुरगूडमध्ये शिव जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:02+5:302021-02-23T04:36:02+5:30
इतिहासकालीन सेट तर सेल्फी पॉइंट बनला होता. दोन दिवसांत अनेकांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप रघुनाथ ...

मुरगूडमध्ये शिव जागर
इतिहासकालीन सेट तर सेल्फी पॉइंट बनला होता. दोन दिवसांत अनेकांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप रघुनाथ भारमल यांना शिव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पहिल्या दिवशी सेटचे उद्घाटन आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सपोनि विकास बडवे सर्व पोलीस कर्मचारी, मोहन गुजर, व्ही. आर. भोसले, जीवन साळोखे, मधकुर कुंभार आदींच्या हस्ते पार पडले. तर सायंकाळी विविध मान्यवरांचा सत्कार आणि समाधान सोनाळकर यांचे ‘शिवाजी महाराज यांची शस्त्रनीती’ या विषयावर व्याख्यान झाले, तर दुसऱ्या दिवशी शिवव्याख्याते भिकाजी मगदूम यांचे ‘शिवकाल आणि आजकाल’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी सहा पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, अविनाश पाटील, पद्मसिंह पाटील, सत्यजित पाटील, मोहनराव गुजर, व्ही. आर. भोसले, जीवन साळोखे, दगडू शेणवी, राजू आमते, सुनील रणवरे, विक्रम गुर्जर, राहुल शिंदे, संतोष रणवरे, अनिल दिवटे आदींची उपस्थिती होती. स्वागत राजू चव्हाण यांनी तर प्रास्ताविक रवींद्र शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.