शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर गाडी सजवली, फलक-स्पीकर लावून शहरभर फेरी मारली; शिवजयंती दिनीच कोल्हापुरात शिवभक्ताचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:25 IST

लोकमतवर विशेष प्रेम

कोल्हापूर : शिवजयंती असल्याने त्यांनी रात्रभर गाडी सजवली, प्रबोधनाचे संदेश देणारे फलक व स्पीकर लावून मंडळाच्या उत्सव कार्यक्रमांना भेटी दिल्या, मंगळवारी सकाळी उठून शिवाजी चौक, दसरा चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी प्लास्टरच्या मूर्तीवरील बंदी हटवण्याचे निवेदन द्यायला पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. मात्र, येथेच त्यांना चक्कर आल्याचे निमित्त झाले अन् नियतीने शिवभक्ताची ही प्रबोधनात्मक रिंगण फेरी अर्ध्यावरतीच रोखली.मारुती उर्फ बाळासाहेब धोंडिराम निगवेकर (वय ७१) असे या शिवभक्ताचे नाव. गंगावेशजवळच्या धोत्री गल्लीत गणेशमूर्ती बनवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. कुंभारमामा या नावानेच ते सर्वपरिचित होते. आपल्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्यांनी कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांवर प्रबोधनात्मक जागर केला होता. प्रत्येक शिवजयंतीला ते गाडीवर वेगळा संदेश लिहून जनजागृती करत होते. यंदाही त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी हटवण्याच्या मागणीचा फलक लावून शहरभर फेरी सुरू केली होती. पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, गुरुवारी आहे.लोकमतवर विशेष प्रेमनिगवेकर यांचे लोकमतवर विशेष प्रेम होते. प्रत्येक वर्धापनदिनाला उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा त्यांचा शिरस्ता कधीच चुकला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती