शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली दुमाला शाखेत आणखी बनावट सोने, बँकेला पत्रव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:29 IST

बनावट सोनेतारण कर्जप्रकरणात संशयितांनी सुमारे १२ बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही केडीसीसी बँकेच्या शिरोली दुमाला शाखेत बनावट सोनेतारण ठेवले आहे. पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार करून माहिती कळवली आहे. राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँकेने अद्याप पोलिसांच्या ताब्यात दागिने दिलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देशिरोली दुमाला शाखेत आणखी बनावट सोने, बँकेला पत्रव्यवहार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची माहिती

कोल्हापूर : बनावट सोनेतारण कर्जप्रकरणात संशयितांनी सुमारे १२ बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही केडीसीसी बँकेच्या शिरोली दुमाला शाखेत बनावट सोनेतारण ठेवले आहे. पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार करून माहिती कळवली आहे. राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँकेने अद्याप पोलिसांच्या ताब्यात दागिने दिलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.आयसीआयसीआय बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), वीरशैव सहकारी बँक, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को-आॅपरेटिव्ह बँक आणि एक पतसंस्था व तीन सराफांकडे दोन किलो ९१ ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून तब्बल ३९ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या १0 जणांच्या टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला आहे.

मुख्य सूत्रधार चंद्रकांत शिवराम भिंगार्डे, अतुल निवृत्ती माने, विलास अर्जुन यादव, विक्रम मधुकर कोईगडे, अमर दिनकर पाटील, भारती श्रीकांत जाधव, राकेश रजनीकांत रणदिवे, पृथ्वीराज प्रकाश गवळी, कविता आनंदराव राक्षे यांना अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, मंगळवारी संपत आहे.

अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आनंदराव राक्षे, (रा. कोरेगाव-सातारा), तानाजी केरबा माने (रा. गणेशवाडी ता. करवीर) आणि व्यापारी असे तिघेजण पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत; त्यामुळे संशयितांना वाढीव पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली जाणार आहे.झटपट पैसा मिळवणे हाच उद्देशआनंदराव राक्षे व कविताकडून ११ हजार रुपये तोळा या दराने मुख्य सूत्रधार चंद्रकांत भिंगार्डे हा बनावट सोने विकत घेऊन तो इतरांना १३ हजार रुपयांना विकत असे. हेच सोने बँकेत तारण ठेवून त्यावर १८ ते २० हजार रुपये कर्ज उचलायचे. त्यानंतर ते पैसे भिंगार्डे व कर्जदार वाटून घ्यायचे. पैसा मिळवणे हाच मुख्य उद्देश संशयितांचा होता, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.तो व्यापारी कोण?भिंगार्डेच्या आॅर्डरप्रमाणे आनंदराव राक्षे हा एका व्यापाºयाकडून कुरिअरने बनावट सोने मागवून घेत असे. काहीवेळा भिंगार्डेही थेट व्यापाऱ्यांकडून सोने कुरिअरने मागवून घेत होता. त्याचा मोबाईल नंबर भिंगार्डेकडे आहे. बनावट सोन्यांची विक्री करणारा व्यापारी कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत. हा व्यापारी मिळाल्यानंतर आणखी किती बँकांची फसवणूक झाली आहे, हे स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर