शिरोलीच्या विकास हाच ध्यास - शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:05+5:302020-12-09T04:19:05+5:30

यावेळी महाडिक म्हणाल्या, शिरोली गावासाठी माजी आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली असून भविष्यात ...

Shiroli's development is the focus - Shaumika Mahadik | शिरोलीच्या विकास हाच ध्यास - शौमिका महाडिक

शिरोलीच्या विकास हाच ध्यास - शौमिका महाडिक

यावेळी महाडिक म्हणाल्या, शिरोली गावासाठी माजी आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली असून भविष्यात देखील अशीच कामे होत राहतील. यावेळी वडगाव मार्केट कमिटी माजी सभापती सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा पाटील, बाबासाहेब कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, बाजीराव पाटील, बाबासाहेब कांबळे, विनायक कुंभार, सूर्यकांत खटाळे, श्वेता गुरव, संध्याराणी कुरणे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, रामचंद्र बुडकर, भारती व्हानागडे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरिफ सर्जेखान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सुरेश पाटील यांनी आभार मानले.

विरोधकांनी आमच्या कामाचे श्रेय लाटत जनतेची दिशाभूल करू नये. गावचा विकासच करायचा असेल तर स्वत: निधी लावावा, असा टोला ग्रामपंचायत‌ सदस्य बाजीराव पाटील यांनी लगावला.

फोटो ओळी : शिरोली शिवाजीनगर येथे विकासकामाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक. शेजारी सुरेश पाटील, पुष्पा पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे‌ आदी उपस्थित होते.

०८ शिरोली शौमिका महाडिक

Web Title: Shiroli's development is the focus - Shaumika Mahadik