शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांचा बेळगावात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:26+5:302021-09-07T04:28:26+5:30
लाॅकडाऊन काळात शिरोली परिसरातील परप्रांतीय कामगार, गावातील गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी खवरे यांनी एक महिना मोफत धान्य ...

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांचा बेळगावात गौरव
लाॅकडाऊन काळात शिरोली परिसरातील परप्रांतीय कामगार, गावातील गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी खवरे यांनी एक महिना मोफत धान्य वाटप केले. शिवाय २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीने त्यांचा गौरव केला. यावेळी उपसरपंच सुरेश यादव, उत्तम पाटील उपस्थित होते.
फोटो : ०६ शिरोली खवरे
शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावार, उपसरपंच सुरेश यादव आदी उपस्थित होते.
०५