शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Kolhapur: महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला, कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:16 IST

सहा गावांत निवारा केंद्रांचा प्रस्ताव

संदीप बावचेजयसिंगपूर : पावसाळा सुरु झाला असून, तालुका प्रशासनही सज्ज आहे. विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे अनेक पूरग्रस्तांना स्थलांतरित व्हावे लागते. तालुक्यात कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेनेही आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून अथवा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निवारा केंद्रे उभारण्यासाठी निधी मिळू शकतो. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.गेल्या १९ वर्षांत शिरोळ तालुक्याला चारवेळा महापुराचा फटका बसला आहे. सन २०१९ साली आतापर्यंतचा उच्चांक मोडून महापूर आला होता. जवळपास ४७ गावांना यावेळी पुराचा फटका बसला होता. १० हजार ३६५ कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. यामध्ये ६५ हजार २१३ नागरिक स्थलांतरित झाले होते. नातेवाइकांबरोबर स्वत: पर्यायी व्यवस्था करणारी लोकसंख्या ४५ हजार ६१९ होती. तर १९ हजार ५९४ पूरग्रस्त निवारा केंद्रात होते. ४२ ठिकाणी निवारा केंद्राची सोय करण्यात आली होती. महापुराची ही परिस्थिती पाहता मनुष्यहानी होऊ नये, पशुधनाला फटका बसू नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मान्सूनपूर्व तयारी केली जाते. आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेऊन शिरोळ तालुक्यात कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली होती. तालुक्यात महापुरामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित व्हावे लागते. मात्र निवाऱ्याची सोय नसल्याने अनेक पूरग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गायरान जमिनीमध्ये कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारावीत, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निधीचा पर्यायतालुक्यातील धरणगुत्ती, नांदणी, तेरवाड, टाकळीवाडी, अब्दुललाट व जैनापूर या सहा ठिकाणी निवारा केंद्रांचा प्रस्ताव आहे. याठिकाणी कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारल्यास जवळपास ४६ गावांतील पूरग्रस्तांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. जयसिंगपूर येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत निवारा केंद्राबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा झाली. त्यामुळे जागतिक बँकेकडून निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निवारा केंद्र उभारण्यासाठी पर्याय उभा राहू शकतो. शिवाय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत देखील निवारा केंद्रासाठी निधीचा पर्याय आहे.

कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारावीत यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीच मागणी केली होती. महापुराच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी निवारा केंद्रे सोयीची ठरणार आहेत. त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. - आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरshirol-acशिरोळ