जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये शिरोळ तालुका प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:41+5:302021-04-04T04:25:41+5:30

जयसिंगपूर : आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या ठेवी संकलनाच्या उद्दिष्टामध्ये शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ...

Shirol taluka first in fulfilling the objective of district bank deposit | जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये शिरोळ तालुका प्रथम

जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये शिरोळ तालुका प्रथम

जयसिंगपूर : आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या ठेवी संकलनाच्या उद्दिष्टामध्ये शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. यासाठी बँकेच्या सर्व घटकांनी सहकार्य केले ते सर्वजण कौतुकास पात्र आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

ठेवी संकलनासाठी शिरोळ तालुक्याला ८१५ कोटी ६० लाखांचे उद्दिष्ट दिले होते. अधिकारी व कर्मचारी यांचे प्रयत्न व सभासद ठेवीदार यांनी केलेले सहकार्य यामुळे मार्च २०२१ अखेर ८८७ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्यात यश आले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या १०९ टक्के ठेवीचे उद्दिष्ट शिरोळ तालुक्याने पूर्ण केले असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिरोळ तालुका जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

त्याचबरोबर वाढीव शेअर्ससाठी शिरोळ तालुक्याला १५० कोटी रुपये संकलित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येसुद्धा शिरोळ तालुक्याने १६९ कोटी ८४ लाखांची रक्कम वाढीव शेअर्स म्हणून संकलित केली आहे. दिलेल्या उद्दिष्टापैकी याचे प्रमाण देखील ११३ टक्के इतके आहे. बँकेच्या जडणघडणीत शिरोळ तालुक्याचे सातत्याने योगदान राहिले आहे. सर्व घटकांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनावर सातत्याने विश्वास व्यक्त करताना बँक वाढीसाठी सहकार्य केले आहे. बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचा कारभार महाराष्ट्रात आदर्शवत झाला असून, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची शिखर बँक म्हणून प्रगतिपथावर आहे, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

Web Title: Shirol taluka first in fulfilling the objective of district bank deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.