शिरोळ पं. स. सभापतिपदी दीपाली परीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:53+5:302021-06-16T04:32:53+5:30
शिरोळ पंचायत समितीच्या सदस्या कविता चौगुले यांनी आघाडीअंतर्गत ठरलेला कार्यकाल संपल्याने सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त ...

शिरोळ पं. स. सभापतिपदी दीपाली परीट
शिरोळ पंचायत समितीच्या सदस्या कविता चौगुले यांनी आघाडीअंतर्गत ठरलेला कार्यकाल संपल्याने सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी परीट यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मोरे यांनी सभापतिपदी परीट यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पंचायत समितीत दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आहे. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. या वेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, प्रकाश पाटील-टाकवडेकर, शिवगोंडा पाटील, कलगोंडा पाटील, हैदर मोकाशी, बाबासाहेब वनकोरे, कुशाल कांबळे, विलास काटकर, उमेश पाटील, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, संजय परीट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १५०६२०२१-जेएवाय-०५-दीपाली परीट