शिरोळ दत्त आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:39+5:302021-07-19T04:16:39+5:30
शेरबेट यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आरोग्य केंद्र कोरोना काळात अखंडितपणे सेवा देत आहे. ...

शिरोळ दत्त आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
शेरबेट यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आरोग्य केंद्र कोरोना काळात अखंडितपणे सेवा देत आहे.
शिरोळ व सीमाभागातील रुग्णांना वरदान ठरलेल्या या दत्त आरोग्य केंद्रात चोवीस तास वैद्यकीय सेवा सुरू आहे. या कालावधीत आरोग्य केंद्रातील कर्मचारी वैशाली आवळे व त्यांचे पती संतोष आवळे यांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी डॉ. शेरबेट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार दिला. तसेच डॉ. शेरबेट यांच्या औषधोपचाराने आवळे दाम्पत्यांनी कोरोनावर विजयदेखील मिळविला. या सहकार्याबद्दल आवळे दाम्पत्यांनी डॉ. शेरबेट यांच्यासह डॉ. प्रिया खाडे, डॉ. राजेंद्र डिग्रजे, डॉ. गजानन चौगुले, डॉ. कुमार पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत वैशाली आवळे यांनी केले.
याप्रसंगी प्रदीप पाटील, अजित बसन्नावर, श्रीकृष्ण खोंद्रे, किरण भोसले, अजिंक्य गावडे, तेजस्विनी पाटील, ओमकार शिरगिरे, भाग्यश्री भोसले, वैशाली कुरणे, शैलजा गवळी, सुधा कांबळे, वर्षा काळे, क्षितिज सुतार, अरविंद वासकर, किशोर कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १८०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.