शिरोळ पालिका रुग्णवाहिका खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:58+5:302021-06-16T04:32:58+5:30
शिरोळ : आमदार स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय शिरोळ नगरपालिकेने घेतला आहे. मंगळवारी पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत ...

शिरोळ पालिका रुग्णवाहिका खरेदी करणार
शिरोळ : आमदार स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय शिरोळ नगरपालिकेने घेतला आहे. मंगळवारी पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत हा ठराव करण्यात आला. या वेळी सभेपुढील नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते.
विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बालकोविड सेंटरला शाळा दिल्याबद्दल मोहनराव माने यांच्यासह पालिकेला निधी दिल्याबद्दल सुरुवातीला आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे १५ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. तर खासदार माने यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून सांस्कृतिक सभागृह, औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर व वाचनालयाला निधी अशी तरतूद आहे. सभेत पालिकेच्या मालकीच्या दुकान गाळांना कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर समन्वयकांची नियुक्ती करणे, यासह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. सभेस मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या वेळी नगरसेवक तातोबा पाटील यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, असा ठराव मांडला.