शिरोळमध्ये ४९१ महिला निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:22+5:302021-01-08T05:19:22+5:30

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या धोरणानुसार ग्रामपंचायतीच्या सभागृहात तब्बल २२९ महिला सदस्या असणार ...

In Shirol, 491 women are in the fray | शिरोळमध्ये ४९१ महिला निवडणूक रिंगणात

शिरोळमध्ये ४९१ महिला निवडणूक रिंगणात

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या धोरणानुसार ग्रामपंचायतीच्या सभागृहात तब्बल २२९ महिला सदस्या असणार आहेत. अर्ज माघारीनंतर सतरा महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता २१२ जागांसाठी ४९१ महिला निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पन्नास टक्के प्रतिनिधीत्व करण्याची संधी महिलांना आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवर स्त्री नेतृत्व पाहायला मिळते. पन्नास टक्के आरक्षणामुळे प्रत्येक गावात पुरुषांपेक्षा महिलांसाठी एक जागा जास्त आरक्षित आहे. त्यामुळे महिला आरक्षित जागेवर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ४२५ पैकी २२९ महिलांना सदस्य पदाची संधी मिळणार आहे. अर्ज माघारीनंतर १७ महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित २१२ जागांसाठी ४९१ महिला आपले भवितव्य अजमावत आहेत.

गावनिहाय महिलांची संख्या - नृसिंहवाडी - १४, कवठेगुलंद - ७, शेडशाळ - १४, गणेशवाडी - १७, आलास २४, बुबनाळ - ६, जांभळी - १६, बस्तवाड - १०, मजरेवाडी - ६, तेरवाड - २२, शिरढोण - २०, यड्राव - २२, निमशिरगाव - १७, तमदलगे - ८, अर्जुनवाड - ११, कुटवाड - १०, घोसरवाड - १२, टाकळीवाडी - १०, जुने दानवाड - ११, उदगाव - १६, कोथळी - १८, जैनापूर - १४, चिपरी - २२, कोंडीग्रे - ११, गौरवाड - १०, घालवाड - १०, दत्तवाड - २२, दानोळी - १९, शिरदवाड - १७, शिरटी - १५, हसूर - १४, धरणगुत्ती - १६, नांदणी - २०.

Web Title: In Shirol, 491 women are in the fray