शिरोडी शेतवस्तीवर दरोडा
By Admin | Updated: July 5, 2014 01:02 IST2014-07-05T00:51:32+5:302014-07-05T01:02:20+5:30
वाळूज महानगर : वाळूज परिसरात गेल्या पंधरवड्यापासून दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून, काल रात्री शिरोडी शेतवस्तीवर पाच दरोडेखोरांनी तिघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून
शिरोडी शेतवस्तीवर दरोडा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. जनसुविधा योजनेत ढपला पाडल्याचा आरोप सदस्यांनी केल्यानंतर त्यांची चौकशी सोमवार (दि. ७)पासून सुरू होत आहे. याबाबत आज, शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातून एक तक्रार दाखल झाली आहे.
नितीन माने यांनी जनसुविधासह विविध कामांत थेट पैशांची मागणी केल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांनी चौकशीची मागणी सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर माने यांची पुणे जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनच बदली झाली. त्यामुळे त्यांची चौकशी होणार का? हे महत्त्वाचे होते; पण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत विभागाकडे माहिती मागवली आहे. नितीन माने यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीतील कामकाजाची सर्व माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्णातूनही माने यांच्या विरोधात पी. बी. पाटील यांच्याकडे तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. तक्रारींचे स्वरूप पाहता, नितीन माने यांच्यावर केलेल्या आरोपांची व्याप्ती लक्षात येते. विभागातील कागदपत्रांबरोबरच सदस्य शशिकांत खोत यांच्याकडूनही काही माहिती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर अनेकजण तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याने हे प्रकरण गाजणार, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)