शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अकरा कोटी खर्चून उभारलेला शिरगावचा पूल पुराच्या पाण्याखाली, अधिकाऱ्यांचा दावा ठरला फोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:13 IST

..तर या मार्गावरून कोल्हापूर-राधानगरी-फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती

बाजीराव फराकटेशिरगाव : राधानगरी तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीला मोठा महापूर आला असून शिरगाव येथील नवीन पुलासाठी खर्च केलेले अकरा कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचे या पुरामुळे दिसत आहे. आणखी पाच फुट उंची केली असती तर या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती.राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे मोठ्या पुलाची गरज असल्याचे दैनिक लोकमत मधुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाला मंजुरी दिली होती. त्यानंतर भुमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले. तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. काम सुरू असताना या परिसरातील नागरिकांनी व प्रमुख नेत्यांनी पुलाच्या उंचीबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुलांवर पाणी येणार नसल्याचे सांगितले. सध्या या नवीन पुलावर तीन चार फूट उंच पाणी आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. जर आणखी चार पाच फूट उंची वाढविली असती तर या मार्गावरून कोल्हापूर- राधानगरी - फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला. परंतु अधिकारी वर्गाच्या मनमानी पद्धतीने केलेल्या या कामामुळे मोठा पुल असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने अकरा कोटी रुपये खर्च केलेला पाण्यात गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरTrafficवाहतूक कोंडी