शिरगाव- आमजाई व्हरवडे रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:40+5:302021-08-21T04:28:40+5:30
राधानगरी तालुक्यातील महत्त्वाचा असणारा हा रस्ता गेले कित्येक दिवस झाले अद्याप दुर्लक्षित आहे. या रस्त्यावरून मोठमोठ्या वाहनांची ये-जा असते. ...

शिरगाव- आमजाई व्हरवडे रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा
राधानगरी तालुक्यातील महत्त्वाचा असणारा हा रस्ता गेले कित्येक दिवस झाले अद्याप दुर्लक्षित आहे. या रस्त्यावरून मोठमोठ्या वाहनांची ये-जा असते. जिल्हा परिषद की सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्यावर सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागते. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर भोगावती नदीवरील पुलावर तर रस्त्यांत खड्डा की खड्ड्यात रस्ता हे काय कळत नाही. वाहनधारक कधी नदीत पडतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या रस्त्याला खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आहेत की नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या निदर्शनास हा रस्ता व पुलावरील खड्डे दिसतात का नाही, असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. एखादा मोठा अपघात झाला तरचं लक्ष देणार आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो : शिरगाव-आमजाई व्हरवडे रस्त्यावर असे अनेक खड्डे पडले असून वाहनधारक अशी कसरत करत आहेत.
शिरगाव- आमजाई व्हरवडे रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा ! अधिकारी पदाधिकारी यांचे दुर्लक्ष !!!
To: >
बातमीतील दुसरा फोटो : शिरगाव धरणावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अशी कसरत करावी लागत आहे.
छाया: बाजीराव फराकटे