शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

Hatkanangale Lok Sabha Result 2024: अटीतटीच्या लढतीत धैर्यशील मानेंची बाजी, ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील पराभूत

By समीर देशपांडे | Updated: June 4, 2024 18:29 IST

Hatkanangale Lok Sabha Result 2024: अटीतटीच्या लढतीत धैर्यशील मानेंची बाजी, ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील पराभूत

कोल्हापूर : उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याने अडचणीत आलेले शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी अटीतटीच्या लढतीत हातकणंगले मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. त्यांनी  १४ हजार ७२३ मतांनी उध्दवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी हे तीन लाख मतांहून पिछाडीवर राहिले आहेत.शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलाव परिसरातील गोदामामध्ये हातकणंगले मतदारसंघाची मोजणी सकाळी सुरू झाली. सुरूवातीपासूनच सरूडकर हे थोड्या फरकाने का असेना पण सातत्याने आघाडीवर होते. बाराव्या फेरीअखेर सत्यजित पाटील-सरूडकर हे ६,२९० मतांनी आघाडीवर होते. परंतू  १४ व्या फेरीत त्यांचे हे मताधिक्य निम्म्यावर आले. यानंतर परिस्थिती बदलून धैर्यशील माने यांची आघाडी सुरू झाली आणि  १६ व्या फेरीअखेर माने ७ ३५१ मतांनी आघाडीवर आले. यानंतर मात्र शेवटच्या फेरीअखेर माने यांनी मताधिक्य सोडले नाही.या दोघांच्या अटीतटीच्या लढतीत माजी खासदार राजू शेट्टी मात्र फारच पिछाडीवर राहिले. ते सरूडकर यांच्यापेक्षा ३ लाख मतांनी मागे राहिले. दरम्यान माने यांच्या विजयाची खात्री झाल्यानंतर त्यांच्या कोल्हापुरातील रूईकर कॉलनीच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. माने यांना शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि वाळव्याने पाठबळ दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्या विजयासाठी राबवलेली यंत्रणा माने यांना विजयापर्यंत घेवून गेली. या मतदारसंघात आमदार विनय कोरेंसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे श्रमही कारणीभूत ठरले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dhairyasheel maneधैर्यशील मानेSatyajit Patilसत्यजित पाटील