शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत

By समीर देशपांडे | Updated: October 31, 2024 13:12 IST

Maharashtra Vidhan Sabha 2024: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

समीर देशपांडे, कोल्हापूरMaharashtra Vidhan Sabha 2024: ऐन दिवाळीच्या वातावरणात कोल्हापूरमध्ये (Kolhapur) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी गुरूवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये (Eknath Shinde's Shiv Sena) प्रवेश केला आहे.

काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जाधव यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

भाजप ते शिवसेना... कोण आहेत जयश्री जाधव?

जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून शिवसेनचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. 

जाधव यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभर केला आणि त्या आमदार बनल्या. परंतू २०२४ च्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. परंतू कॉंग्रेसकडून सुरूवातीला राजेश लाटकर आणि नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. 

शिंदेंच्या शिवसेनेची खेळी

परिणामी जाधव या तीव्र नाराज झाल्या होत्या. याचाच फायदा उठवत शिंदेसेनेचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट जाधव यांना पक्षात घेण्याची खेळी खेळली आहे. मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी हा प्रवेश झाला. यावेळी क्षीरसागर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित जाधव उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस